मुंबई : म्हाडाचे घर घेणं म्हणजे आयुष्यभराची मोठी गुंतवणूक असते. पण घर घेण्याच्या आनंदात काही महत्त्वाच्या गोष्टी तपासायच्या राहिल्या, तर नंतर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येऊ शकते. अनेक जण सुरुवातीला अति उत्साहात निर्णय घेतात, पण नंतर समोर येणाऱ्या अडचणींमुळे मनस्ताप होतो, डोकेदुखी वाढते. म्हणूनच घराची आणि त्या प्रकल्पाची योग्य माहिती घेऊन, संयमाने आणि नीट विचार करून घेतलेला निर्णयच भविष्यात समाधान देणारा ठरतो. घर हे फक्त चार भिंतींचं नसून, ते आयुष्यभराच्या स्वप्नांचं केंद्र असतं. त्यामुळे म्हाडाचे घर (Mhada Flat) घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल टाका, म्हणजे घराचं स्वप्न खरं होताना आनंदही टिकून राहील. त्यासाठी म्हाडाचे घर घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी चेक केल्या पाहिजे.
मुंबई पुण्यात म्हाडाच्या घराचे महत्व खूप आहे, कारण खाजगी बिल्डरांच्या तुलनेत म्हाडा स्वस्तात मस्त घर देते. विशेष म्हणजे सरकारी योजनेतून घर मिळत असल्याने फसवणूक होत नाही. असे असतांना सुद्धा काही गोष्टी चेक करणे गरजेचे आहे. फक्त म्हाडाची लॉटरी निघाली म्हणून किंवा घाईघाईत निर्णय घेतला तर पुढे त्रास होऊ शकतो. म्हणूनच घर घेताना खालील 5 गोष्टी नक्की तपासा..
म्हाडाचे घर घेताना या 5 गोष्टी चेक करा..
(1) फ्लोअर प्लॅन
घर घेताना फक्त चौरस फूट बघून निर्णय घेऊ नका. त्याऐवजी फ्लोअर प्लॅन नीट तपासा. हॉल मोठा पण बेडरूम खूपच लहान, खिडक्या कमी असल्यामुळे प्रकाश-हवा न मिळणं, किचन-हॉलची चुकीची मांडणी अशा गोष्टी त्रासदायक ठरतात. अनेक 1BHK घरांत टॉयलेट थेट बेडरूममध्ये दिलेले असते, अशा घरात बेडरूम असून काहीच फायदा नाही. कारण त्या घरात प्रायव्हसी राहत नाही. त्यासाठी घरात कॉमन टॉयलेट किंवा हॉलजवळ टॉयलेट-बाथरूम असणं चांगलं आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर फ्लोअर प्लॅन पाहणं खूप महत्त्वाचे आहे.
(2) घराचे लोकेशन
म्हाडाचे घर घेताना फक्त किंमत आणि घराची साईझ बघून निर्णय घेऊ नका, तर लोकेशनलाही महत्त्व द्या. लॉटरी लागलीच पाहिजे म्हणून कोणतेही लोकेशन निवडू नका. कारण ऑफिस, शाळा, हॉस्पिटल, मार्केट जवळ असेल तर रोजचं जीवन सोपं होतं आणि सुरक्षित होतं. परिसरात होणारा भविष्यातील विकास घराची किंमत वाढवतो आणि रिसेल व्हॅल्यू सुध्दा जास्त मिळते. म्हणजेच घराचे लोकेशन जर चांगलं असेल तर ते घर भविष्यात मोठा पैसा देतं.
येथे वाचा – मुंबईत 5 हजार घरांची म्हाडा लॉटरी; पहा लॉटरी कोणत्या महिन्यात निघणार?
(3) साईट विजिट
म्हाडाचं घर घेताना फक्त वेबसाईटवरची माहिती किंवा कागदोपत्री डिटेल्सवर अवलंबून राहू नका, तर प्रोजेक्टला प्रत्यक्ष भेट द्या. कारण बांधकामाची क्वालिटी, कॉमन एरिया, लिफ्ट्स, पाणीपुरवठा आणि परिसराची परिस्थिती हे सगळं डोळ्यांनी पाहिल्यावरच खरं चित्र समोर येतं. थोडक्यात, घर खरेदी करण्यापूर्वी साईट विजिट करणं ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे.
(4) एक्स्ट्रा अमाउंट
घर खरेदी करताना फक्त मुख्य किंमत म्हणजेच जाहिरातीत दिलेली किंमत पाहून निर्णय घेऊ नका, कारण त्याशिवाय अजून अनेक लपलेले खर्च असतात. जे आपल्याला घर घेताना सांगितले जात नाही. जसे की रजिस्ट्रेशन फी, स्टॅम्प ड्युटी, मेंटेनन्स, डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग फी किंवा क्लब हाऊस फी अशा एक्स्ट्रा अमाउंटचा विचार न केल्यास नंतर पूर्ण बजेट बिघडतं. तसेच इन्फ्रा डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डर पैसे मांगू शकतात. म्हणून घर घेताना फक्त जाहिरातीतील किंमत पाहून घर घेऊ नका..
येथे वाचा – खुशखबर! आता म्हाडाचे घर स्वस्तं होणार, तब्बल एवढी किंमत होणार कमी..!
(5) गाडी पार्किंग
म्हाडा रिझर्व पार्किंग देत नाही. असे असले तरी बिल्डरला शिल्लक पैसे देऊन पार्किंग देऊ शकतो, हे आधी त्यांना विचारा. जर तुमच्याकडे कार किंवा फोर व्हीलर असेल तर रिझर्व्ह पार्किंग मिळत असलेला प्रोजेक्टचं निवडा.
Kalyan
म्हाडा चांगले प्लॅन करते पण बिल्डर वात लावतात आणि कामं पूर्ण नसताना कंप्लिशन लेटर देतात.. बिल्डर पैसे देऊन घेतात. मग घेणारे परेशान होतात बिल्डर बोलू देत नाही.. चऱ्होली बु ला एक गडा ग्रुप आहे निथ्यम जाऊन बघा तिथं.. लोकांना काय काय समस्या आहेत..यांची सेल ची टीम वेगळी आणि सेल नंतरची वेगळी असते. सेल वाले वाढवून सांगून मोकळे होतात.. नंतर हे बोलू देत नाहीत. Third class सामान वापरतात..
Mumbai any ware
Location need near by Alandi .
Carpet area reqd 550
2nd floor one Bhk
4 wheelar Covered parking reqd.
Budget 18 to 20 lak rs.
Or comercial shop also reqd.
Please call or mail
9860681447
Location: Dadar and nearby area