पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!

Mhada Lottery 2025 : म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करणं म्हणजे फक्त अर्ज भरून मोकळे होणे असं नाही, तर त्यासाठी काही खर्च येतो. अर्जदारांना बहुतेक वेळा असं वाटतं की हा खर्च खूप मोठा असेल. पण खरी गोष्ट अशी आहे की, अर्ज करताना लागणारी रक्कम ही तुमच्या उत्पन्न गटावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने आधी आपला गट समजून घेतला, तर खर्च देखील माहिती करता येतो. यामध्ये अर्ज शुल्क, अनामत रक्कम आणि काही अतिरिक्त शुल्कांचा समावेश असतो. एकदा ही रक्कम भरली की अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते आणि पुढे घर मिळण्याची संधी तुमच्या हाती येते.

पुण्यात घर शोधणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कारण ही घरं पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी तर आहेच, त्यात सगळ्यात खास म्हणजे किंमतही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. महागाईच्या काळातही ही घरं परवडणाऱ्या दरात (affordable flats) उपलब्ध होत असल्यामुळे अनेकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आता अनेकांना एक मोठा प्रश्न पडतोय, तो म्हणजे या घरांच्या किंमती नेमक्या किती असतील? आणि अर्ज भरताना किती रक्कम भरावी लागणार? म्हणजेच अर्ज शुल्क, अनामत रक्कम आणि GST असा एकूण किती खर्च येतो? त्यासोबतच सर्वात स्वस्त घरची किंमत देखील आपण पाहिली आहे.

पुण्यात नुकतीच जाहीर झालेल्या लॉटरीत तब्बल 6168 घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापैकी 1982 घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर मिळणार असून, उर्वरित घरे लॉटरीतून दिली जातील. खास बाब म्हणजे ही घरं मोक्याच्या ठिकाणी असूनही परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहेत. विशेष म्हणजे सर्वात स्वस्त घराची किंमत खूपच कमी आहे. चला तर मग जाणून घेऊया अर्ज भरताना येणारा एकूण खर्च आणि सर्वात स्वस्त घराची किंमत..

पहा अर्ज भरताना तुम्हाला किती खर्च येईल?

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना प्रत्येक अर्जदाराला अर्ज शुल्कासोबत अनामत रक्कम भरावी लागते आणि ही रक्कम उत्पन्न गटानुसार वेगवेगळी आहे. अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 10,000 रुपये असून त्यासोबत अर्ज शुल्क 600 रुपये व GST 108 रुपये धरून असे एकूण 10,708 रुपये भरावे लागतील. अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 20,000 रुपये असून अर्ज शुल्क 600 रुपये व GST 108 रुपये मिळून असे एकूण 20,708 रुपये भरावे लागतील. मध्यम उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 30,000 रुपये असून त्यासोबत अर्ज शुल्क 600 रुपये व GST 108 रुपये धरून एकूण 30,708 रुपये भरावे लागतील. उच्च उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ₹40,000 असून अर्ज शुल्क 600 रुपये व GST 108 रुपये असून एकूण 40,708 रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर घेताना या 5 गोष्टी चेक करा.. नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप..!

पुणे म्हाडा लॉटरीत सर्वात स्वस्त घर (Mhada Cheap Flat Pune)

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी म्हाडाच्या लॉटरीत काही खास पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त घरं 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत देण्यात येणार असून ही घरे PMRDA हद्दीत असतील. महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा संकेत क्रमांक 813-ए/बी असून या प्रकल्पाचं नाव रोहन आनद फेज 1- 1 आरके / 1 बीएचके – सोमाटणे EWS / LIG असं आहे. या घरांची अंदाजे किंमत 9 लाख 95,900 ते 12 लाख 3,900 रुपये या दरम्यान आहे. या घराचे बांधकाम क्षेत्रफळ 34.61 ते 41.87 चौ.मी. एवढ्या क्षेत्रात असून चटई क्षेत्रफळ 23.60 ते 29.02 चौ.मी. एवढं आहे. या योजनेत एकूण 64 घरे उपलब्ध आहेत.

याशिवाय, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेत घरं आणखी स्वस्तात उपलब्ध आहेत. या योजनेत 7 लाखापेक्षाही कमी किमतीत घर उपलब्ध आहे. या योजनेचा संकेत क्रमांक 867-बी असून प्रकल्पाचं नाव आहे चाकण ता. खेड, जि. पुणे, सर्वे नं. 818 PMAY – 1 RK 1 असे आहे. या योजनेतील घरांची किंमत फक्त 6 लाख 95,000 रुपये एवढी आहे. यातील घराचे बांधकाम क्षेत्रफळ 27.74 चौ.मी. क्षेत्रात असून चटई क्षेत्रफळ 23.74 चौ.मी. एवढे आहे. या योजनेत एकूण 3 घरे उपलब्ध आहेत.

येथे वाचा – मुंबईत 5 हजार घरांची म्हाडा लॉटरी; पहा लॉटरी कोणत्या महिन्यात निघणार?

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज कुठे करावा? आणि महत्वाच्या अटी

अर्जदाराने एकदा अनामत रक्कम भरल्यानंतर अर्ज कोणत्याही कारणाने रद्द करता येणार नाही. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, जर अर्जदाराने क्रेडिट कार्डद्वारे अनामत रक्कम भरली आणि ती रक्कम म्हाडाच्या खात्यात जमा झाली नाही किंवा जमा होण्यापूर्वीच परत अर्जदाराच्या खात्यात आली, तर अशा अर्जदारांचा अर्ज सोडतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भरण्यासाठी तुम्ही थेट म्हाडाची अधिकृत वेबसाईट https://housing.mhada.gov.in येथे जाऊ शकता किंवा मोबाईलवर MHADA Lottery App डाउनलोड करूनही अर्ज करू शकता.

अर्ज कसा भरावा, घरांच्या किमती किती असतील, अर्ज प्रक्रिया कशी आहे यासंबंधी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी ‘पुणे म्हाडा लॉटरी 2025’ या लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला अधिकृत जाहिरातीची PDF फाईल मिळेल, ज्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे.

लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्जाची सुरुवात 11 सप्टेंबर 2025 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

5 thoughts on “पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!”

  1. सर्व साधारण गटात कुठे घर आहेत, ते कळलं नाही. कृपया माहिती पाठवा.

    Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group