मुंबईकरांनो! ‘या‘ 8 ट्रिक्सने मिळवा स्वस्तात घर, पहा स्वस्तात घर घेण्याच्या 8 ट्रिक्स..!

Mumbai : मुंबई म्हणजे मायानगरी तसेच अनेकांचे स्वप्नातले शहर. देशातील कानाकोपऱ्यातून कामधंद्यासाठी लोक मुंबईत येत असतात. मुंबईला कधी न थांबणारी व कधी न थकणारी नगरी असं देखील म्हटले जातं. या मुंबईत हक्काचे घर खरेदी करणे सर्वांचेच स्वप्न असते. मुंबईत नोकर्‍या, उद्योगधंदे आणि चांगल्या सुविधा भरमसाठ प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे अनेकांना मुंबईत हक्काचे घर घेऊन राहायचे आहे. पण मुंबईत घरांच्या किमती कोटीत पोहोचलेल्या असताना येथे घर खरेदी कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घर भाडेही खूप महाग असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना मुंबईत राहायला परवडत नाही. त्यामुळे मुंबईत परवडणारे घर खरेदी करता यावे यासाठी लोक प्रयत्न करत असतात. पण परवडणारे घर शोधण्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स माहिती पाहिजे, तरचं तुम्ही स्वस्तात मस्त घर मिळवू शकता.

मुंबईत स्वस्तात घर मिळवण्यासाठी या ट्रिक वापरा

(1) ग्रुप बुकिंग

घर खरेदी करताना 2 ते 4 जणांनी मिळून एकाच प्रोजेक्टमध्ये घराची बुकिंग केल्यास डेव्हलपरकडून मोठी सवलत मिळण्याची शक्यता असते. एकाच वेळी अनेक घरांची विक्री होत असल्याने डेव्हलपर घर खरेदीदारांना किमतीत चांगली सूट देऊ शकतात. कारण एकाच वेळी त्यांची जास्त घरे विकल्याने त्यांचा प्रोजेक्ट लवकर पूर्ण होतो आणि त्यांचा कॅश फ्लो सुधारतो. त्यामुळे खरेदीदारांना किंमतीत सूट, फ्री पार्किंग किंवा इतर फायदे मिळू शकते. त्यासाठी इच्छुक लोकांचा छोटा गट तयार करून डेव्हलपरशी थेट चर्चा करणे आणि सर्व अटी लेखी स्वरूपात घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात घर मिळण्याची शक्यता वाढते.

(2) सिंगल बिल्डिंग प्रोजेक्ट मध्ये घर घ्या

फ्लॅट खरेदी करताना मोठ्या कॉम्प्लेक्सपेक्षा सिंगल बिल्डिंग प्रोजेक्ट निवडणे जास्त फायदेशीर ठरू शकते. कारण अशा प्रोजेक्टमध्ये फ्लॅटचे दर तुलनेने परवडणारे व कमी असतात आणि तुमच्या बजेटमध्ये चांगले पर्याय मिळू शकतात. सिंगल बिल्डिंगमध्ये मेंटेनन्स खर्च कमी येतो, गर्दी कमी असते आणि प्रायव्हसी जास्त मिळते. शिवाय, छोट्या प्रोजेक्टमध्ये डेव्हलपरशी थेट संवाद साधता येतो, ज्यामुळे तुम्हाला किंमतीत किंवा अतिरिक्त सुविधांमध्ये सवलत (Discount) मिळू शकते. अशा प्रोजेक्टमध्ये घराचा ताबा वेळेवर मिळण्याची जास्त शक्यता असते. कारण बांधकामाचे प्रमाण कमी असल्याने काम लवकर पूर्ण होते. त्यामुळे सिंगल बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये घर घेण्याचा प्रयत्न करा.

येथे वाचा – पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!

(3) अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये फ्लॅट बुक करा

फ्लॅट खरेदी करताना बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असताना फ्लॅट बुकिंग (Flat Booking) करणे नेहमी फायदेशीर ठरते. जेव्हा बिल्डिंगचे काम चालू असते तेव्हा फ्लॅटच्या किंमती तुलनेने कमी असतात. तसेच तुम्हाला चांगल्या लोकेशनचा फ्लॅट (Best Location Flat) निवडण्याची पहिली संधी मिळते. प्रोजेक्ट जसजसा पूर्ण होत जातो, तसतसे त्यातील फ्लॅटचे दर वाढत जातात. त्यानंतर रेडी पझेशन (ready possession) असलेले फ्लॅट खूपच महाग मिळतात. त्यामुळे बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असताना फ्लॅट बुक करणे फायद्याचे ठरते. शिवाय, अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेतल्यास तुम्हाला पेमेंट हप्त्यांमध्ये करण्याची सोय मिळते..

(4) म्हाडा लॉटरीतून घर घ्या

मुंबईसारख्या शहरात घर खरेदी करणे महागडे ठरू शकते, पण म्हाडा लॉटरीतून (Mhada Lottery) किफायतशीर दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. या योजनांमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी (EWS, LIG, MIG) वेगवेगळ्या बजेटची घरे उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घर निवडणे सोपे होते. म्हाडाची लॉटरी प्रक्रिया पारदर्शक असते. सरकारी योजनेतून घरे मिळत असल्याने फसवणूक होत नाही. तसेच स्वस्तात मस्त घर मिळते. त्यामुळे म्हाडा लॉटरीतून घर घेण्याचा प्रयत्न करा.

येथे वाचा – म्हाडाचे घर घेताना या 5 गोष्टी चेक करा.. नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप..!

(5) सणासुदीत घर घ्या

सणासुदीच्या काळात घर खरेदी करणे हा फायद्याचा निर्णय ठरू शकतो. डेव्हलपर्स आणि बिल्डर्स सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी विशेष सवलती, फ्री रजिस्ट्रेशन, फ्री पार्किंग किंवा कॅशबॅक सारख्या आकर्षक ऑफर्स (Offers) घेऊन येतात. काही प्रोजेक्ट्समध्ये होम लोनवर कमी व्याजदर किंवा झिरो प्रोसेसिंग फी (Zero processing fee) सारख्या योजना देखील दिल्या जातात. या ऑफर्समुळे तुमचा एकूण खर्च कमी होतो आणि बजेटमध्ये चांगले घर घेता येते. त्यामुळे घर खरेदीचे प्लॅनिंग करताना सणासुदीचा सीझन लक्षात ठेवा आणि या संधीचा फायदा नक्की घ्या.

(6) नव्याने विकसित होणाऱ्या भागात घर घ्या

मुंबईत घरांचे दर खूप जास्त असल्याने शहराजवळ विकसित होत असलेल्या भागात घर खरेदी करणे हा फायदेशीर पर्याय ठरतो. अशा ठिकाणी जमिनीचे आणि फ्लॅटचे दर तुलनेने कमी असतात, त्यामुळे कमी बजेटमध्ये (Low Budget Flat) मोठ्या साइजचे घर घेता येते. असे भाग पुढील काही वर्षांत वेगाने विकसित होतात, त्यामुळे भविष्यात मालमत्तेची किंमत वाढण्याची शक्यता जास्त असते. शिवाय, येथे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, रुंद रस्ते, चांगले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स आणि आधुनिक सोयीसुविधा (Modern amenities) येण्याची शक्यता असल्याने राहणीमान सुधारते. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या भागात घर घेणे फायद्याचे ठरते.

येथे वाचा – मुंबईत 5 हजार घरांची म्हाडा लॉटरी; पहा लॉटरी कोणत्या महिन्यात निघणार?

(7) घर घेताना जास्तीत जास्त रक्कम भरा

घर खरेदी करताना शक्य होईल तितकी मोठी रक्कम भरल्यास डेव्हलपर अतिरिक्त सवलती किंवा ऑफर्स देऊ शकतो. एकरकमी पेमेंट केल्याने डेव्हलपरचा कॅश फ्लो सुधारतो, त्यामुळे तो तुम्हाला किंमतीत देखील सवलत (Discount) देण्यास तयार असतो. शिवाय, कमी लोन घेण्याची गरज पडत असल्याने व्याजावर होणारा खर्च देखील कमी होतो. बरेच डेव्हलपर्स एकरकमी पेमेंट करणाऱ्या घर खरेदीदारांना अतिरिक्त सुविधा जसे की फ्री पार्किंग, मेंटेनन्स सवलत देतात. त्यामुळे जास्तीत जास्त रक्कम भरल्यास घर स्वस्तात आणि फायदेशीर किमतीत मिळू शकते.

(8) महिलांच्या नावावर घर घ्या

मुंबईत घर खरेदी करताना महिलांच्या नावे मालमत्ता घेतल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत मिळते. पूर्वी या सवलतीच्या घरांवर 15 वर्षे विक्रीचा निर्बंध होता, मात्र आता सरकारने तो हटवला आहे. त्यामुळे महिलांच्या नावे फ्लॅट खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं असून, घर घेणाऱ्यांना थेट आर्थिक फायदा मिळतो. त्यामुळे महिलांचे नावावर घर घेण्याचा प्रयत्न करा.

3 thoughts on “मुंबईकरांनो! ‘या‘ 8 ट्रिक्सने मिळवा स्वस्तात घर, पहा स्वस्तात घर घेण्याच्या 8 ट्रिक्स..!”

Leave a Comment

Join WhatsApp Group