Housing lottery Mumbai : मुंबईकरांनो, या दसरा-दिवाळीत स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे का? मग ही बातमी नक्की वाचा. कारण आता दसरा दिवाळीत तुमचं घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत म्हाडा लॉटरी (Mhada Lottery) आणि सिडको लॉटरीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहेत. तसेच मुंबई पुण्यात या योजना परवडणाऱ्या घरांसाठी खूपच महत्त्वाच्या आणि वरदान ठरल्या आहे. त्यामुळे अनेक जण या योजना जाहीर होण्याची प्रतीक्षा करत असतात.
सणासुदीचा मुहूर्त साधून आपलं नवीन घर घेण्याचं अनेकांचे स्वप्न असतं. आता हे स्वप्न पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. कारण यंदा दसरा दिवाळीत जम्बो हाउसिंग लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे, ज्यात स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होऊ शकतात. सनासुदीचा काळ त्यात पुन्हा घर घेण्याची संधी, यामुळे तुमचा आनंद दुप्पट होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण बातमी..
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तब्बल 22 हजार घरांची लॉटरी (Housing Lottery) जाहीर होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी NDTV मराठीशी बोलताना दिली. घरांच्या किमतींबाबत नेहमीच चर्चा रंगत असते, कारण “माझ्या पसंतीचे सिडकोचे घर” या योजनेत किमती जास्त असल्याने अनेकांनी अर्ज करण्यास उत्साह दाखवला नव्हता. तसेच किमती कमी करण्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर होत होती. याच पार्श्वभूमीवर आता सिंघल यांनी घरांच्या किमतींबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं असून, नागरिकांच्या अपेक्षांना आता योग्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येथे वाचा – मुंबईकरांनो! ‘या‘ 8 ट्रिक्सने मिळवा स्वस्तात घर, पहा स्वस्तात घर घेण्याच्या 8 ट्रिक्स..!
सिंघल यांनी स्पष्ट केलं की, सामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणं हेच सिडकोचं मुख्य ध्येय आहे. सध्या घरांच्या किंमती कमी करण्याची जोरदार मागणी होत असल्याने सिडको महाराष्ट्र सरकारसोबत या विषयावर चर्चा करत आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी किफायतशीर दरात घरे (Affordable flats) मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी सिडकोने किमती कमी करण्यास नकार दर्शवला होता, पण आता या मुद्द्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
येथे वाचा – पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!
सध्या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचे सिंघल यांनी सांगितले. या चर्चेतून लवकरच सकारात्मक निर्णय होईल आणि किंमती कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत निवड झालेल्या घरांसाठी हप्त्यांच्या (installments) पद्धतीला या महिन्यापासून सुरुवात होणार आहे. काही लाभार्थ्यांचे हप्ते सुरूही झाले असून, ज्यांना घरे मिळाली आहेत त्यांना हे हप्ते भरावे लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
नवी मुंबई परिसरातील वाढती घरांची मागणी लक्षात घेता, सिडकोकडून लवकरच नवी लॉटरी (Cidco Lottery) जाहीर होणार आहे. या लॉटरीत तब्बल 22 हजार घरांचा समावेश असणार असून, घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. लवकरच अर्ज प्रक्रिया माहिती आणि इतर सविस्तर माहिती जाहीर केली जाणार असून, दसरा किंवा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या नव्या लॉटरीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Airoli Chhindwara Ganesh Nagar Trimurti chaal
Sir,
I am an central govt employee and we are having transfer all India .This is my last transfer and I want to be settlement so how I can complete my documents for mahada booking ,residential ,adhar card,election card etc.
Vinod S Redkar