Ladki bahin yojana ekyc : नमस्कार! ‘लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक महिलांनी ही केवायसी पूर्ण केली असली, तरी काहींची प्रक्रिया बाकी आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, केवायसी पूर्ण केली तरीही काही महिलांचा योजनेचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात आणि यामागची कारणे काय आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
ई-केवायसीसाठी काय आवश्यक आहे? (Ladki Bahin Yojana Ekyc)
ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान लाभार्थी महिलेला स्वतःचा आधार क्रमांक आणि त्यासोबत पतीचा (विवाहित असल्यास) किंवा वडिलांचा (अविवाहित असल्यास) आधार क्रमांक द्यावा लागतो. या आधार क्रमांकांद्वारे कुटुंबातील माहिती तपासली जाते. या तपासणीत काही महिला अपात्र ठरू शकतात आणि त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो.
खालील कारणांमुळे योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे:
(1) महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक
लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. जर ती राज्याबाहेरील असेल, तर तिचा हप्ता बंद होईल.
(2) कुटुंबातील पात्र महिलांची मर्यादा
योजनेनुसार, एका रेशन कार्डवर आधारित कुटुंबात फक्त एक विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला आणि एक अविवाहित मुलगी पात्र आहे. यापेक्षा जास्त महिला असतील, तर अतिरिक्त महिलांचा लाभ बंद होईल. केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तपासला जाईल, ज्यामुळे ही माहिती समोर येईल.
(3) वयाची अट
लाभार्थी महिलेचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षे असावे. काही महिलांनी फॉर्म भरताना चुकीचे वय (उदा., 21 वर्षांपेक्षा कमी किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त) दाखवले असेल, तर त्यांचा हप्ता बंद होईल. आधार कार्डवरील वयानुसार ही तपासणी होईल.
येथे वाचा – पाऊस अजून किती दिवस पडणार? पहा पंजाब डख काय म्हणतात..!
(4) आधार-लिंक्ड बँक खाते
योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे बँक खाते (Bank Account) आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. जर खाते आधारशी लिंक नसेल, तर हप्ता बंद होईल.
(5) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये. रेशन कार्डावरील कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे (उदा., पती किंवा वडील) उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास, आधार क्रमांकाद्वारे ही माहिती उघड होईल आणि हप्ता बंद होईल.
येथे वाचा – तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..
(6) आयकरदाता कुटुंब
जर कुटुंबातील कोणता सदस्य (पती किंवा वडील) आयकरदाता असेल आणि त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्या कुटुंबातील महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही. आधार क्रमांकाद्वारे आयकर रिटर्न (ITR) तपासले जाईल.
(7) सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक
जर कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकार किंवा त्यांच्या उपक्रमांमध्ये नियमित कायमस्वरूपी कर्मचारी असतील किंवा निवृत्तीनंतर अडीच लाखांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेत असतील, तर त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरतील. मात्र, स्वयंसेवी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्यास ते पात्र राहतील.
(8) इतर योजनांचा लाभ
जर एखादी महिला शासनाच्या इतर योजनांमधून (उदा., संजय गांधी निराधार योजना) दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेत असेल, तर तिला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500 ऐवजी 500 रुपये मिळतील.
(9) खासदार/आमदार किंवा बोर्ड सदस्य
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, किंवा सरकारी बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक असतील, त्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
येथे वाचा – ‘या‘ 8 ट्रिक्सने मिळवा स्वस्तात घर, पहा स्वस्तात घर घेण्याच्या 8 ट्रिक्स..!
(10) चारचाकी वाहन
जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या (पती किंवा वडील) नावावर चारचाकी वाहन नोंदणीकृत असेल, तर त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरतील. मात्र, शेतकऱ्यांकडील ट्रॅक्टरला यातून सूट आहे. आधार क्रमांकाद्वारे आरटीओ रेकॉर्ड तपासला जाईल, ज्यामुळे ही माहिती समोर येईल.
काय करावे?
ई-केवायसी करताना वरील सर्व निकष लक्षात ठेवा. जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही अटी पूर्ण करत नसाल, तर तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवायसी करायची की नाही, याचा विचार काळजीपूर्वक करा. विशेषतः चारचाकी वाहन किंवा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांनी याबाबत सतर्क राहावे.