आता मुंबईत पुण्यात ऑफरमध्ये मिळवा घर; फक्त 20 लाखांपासून घरे..

गृहखरेदीदारांसाठी चांगली बातमी आली आहे. मुंबईत पुन्हा एकदा गृहप्रदर्शनांचा (Home Expo) हंगाम सुरू झाला आहे. या प्रदर्शनांत शहरातील आणि आसपासच्या भागातील प्रमुख डेव्हलपर्स आपले नवे प्रकल्प सादर करत असतात. त्यामुळे एकाच ठिकाणी शेकडो प्रकल्प पाहण्याची, आपल्या बजेटनुसार घर निवडण्याची आणि थेट डेव्हलपरशी चर्चा करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. कमी व्याजदरात बँक लोन तसेच अनेक सवलती यात मिळणार आहे.

मुंबईत पुण्यात दरवर्षी यामाध्यमातून घर घेण्याची संधी मिळते. कारण मुंबईत व आसपासच्या भागात MCHI-CREDAI प्रॉपर्टी एक्स्पो, होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो आणि Times Property Expo यांसारखी मोठी गृहप्रदर्शनं होत असतात. यंदा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे एकदा नक्की बघा.

लोकेशन कुठे आहे?

देशातील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’ (नरेडको) महाराष्ट्र विभागाने आयोजित केलेल्या ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ला शुक्रवारी (26 सप्टेंबर रोजी) भव्य सुरुवात झाली. उद्घाटनादिवशीच तब्बल पाचशेहून अधिक नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचे अनावरण करण्यात आले, ज्यांची एकत्रित किंमत 1 लाख कोटीहून जास्त आहे. घर खरेदीदार तसेच गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे. हे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025‘ मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) याठिकाणी भरले आहे. यात फक्त 20 लाखांपासून घरे आहेत. हे प्रॉपर्टी प्रदर्शन रविवार, 28 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे घर शोधत असाल, तर या एक्स्पोमध्ये जाऊन थेट डेव्हलपरकडून प्रोजेक्ट्सची माहिती घेण्याची उत्तम संधी आहे.

येथे वाचा – मुंबईकरांनो! तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..

विशेष म्हणजे या प्रदर्शनात मोठ्या सवलतींसह विविध गृहनिर्माण प्रकल्प सादर झाले असून, अल्पदरात कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तसंस्थाही याच ठिकाणी उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या घरांपासून ते आलिशान प्रॉपर्टीपर्यंत सर्व पर्याय येथे पाहता येतात.

यात खास काय?

होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 ची मुख्य आकर्षणं खूपच खास आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर आणि आसपासच्या भागातील 500 पेक्षा जास्त नवीन प्रकल्प येथे पाहायला मिळतील. आघाडीच्या बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून स्टॅम्प ड्युटी माफी, नोंदणी भत्ते आणि कमी व्याजदराचे गृहकर्ज यांसारख्या विशेष उत्सवी ऑफर्स उपलब्ध असतील. तसेच गोदरेज प्रॉपर्टीज, अदानी रिअॅल्टी, हिरानंदानी, महिंद्र लाईफस्पेसेस, रेमंड रिअॅल्टी यांसारखे प्रमुख डेव्हलपर्स सहभागी होणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच इंटरनॅशनल पॅव्हेलियनमध्ये निवडक परदेशी प्रॉपर्टी पर्यायही पाहायला मिळतील, ज्यामुळे गुंतवणुकीसाठी हा एक्स्पो आणखी खास ठरणार आहे.

येथे वाचा – पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!

2 thoughts on “आता मुंबईत पुण्यात ऑफरमध्ये मिळवा घर; फक्त 20 लाखांपासून घरे..”

    • Please give contact number to enquire locations of the properties as we are also in need. We are unable to reach at BKC. So help us.

      Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group