Mhada flats in Mumbai : मुंबईकरांचं एक मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर आणि ते ही मुंबईत. त्यामुळेच म्हाडाची लॉटरी (Mhada Lottery) लागावी म्हणून हजारो लोक धावपळ करतात. कारण या मायानगरी मुंबईत हक्काचे घर असण्याला खूपच महत्त्व आहे. त्यामुळे म्हाडाची घरे (Mhada Flats) बाजारभावापेक्षा स्वस्तात मस्त मिळत असल्यामुळे अनेक लोकं म्हाडाची लॉटरी निघाली की अर्ज करतात. म्हाडाकडून दरवर्षी मुंबईत नवी घरे उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे सामान्य माणसाला देखील मुंबईत हक्काचं घर घेण्याची संधी मिळते. आता पुढील काळात मुंबईत म्हाडाची काही घरे उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे मुंबईत हजारो घरांची निर्मिती करण्याची योजना म्हाडाने तयार केली आहे. चला पाहूया संपूर्ण बातमी..
म्हाडाने (Mhada) चालू आर्थिक वर्षासाठी घरांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला आहे. या आढाव्यानुसार मुंबईत सामान्य नागरिकांसाठी 1,474 इतकी घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच मुंबईत गिरणी कामगारांसाठी आणखी 4,215 घरे उभारण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर राज्यभरात साडेअकरा हजारांहून अधिक घरांची निर्मिती होणार आहे. घरांच्या या सर्व प्रस्तावांना म्हाडाने हिरवा कंदील दिला असून, आगामी काळात मोठ्या प्रमाणावर घरांची उपलब्धता वाढणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जायस्वाल यांनी राज्यात तब्बल 2 लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष ठेवले आहे. या दिशेने सध्या कामाला वेग आला असून, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातूनही हजारो नवीन घरे उभारण्याची तयारी म्हाडाने केली आहे.
येथे वाचा – आता मुंबईत पुण्यात ऑफरमध्ये मिळवा घर; फक्त 20 लाखांपासून घरे..
कोणत्या गटासाठी किती घरे?
मुंबईत 2025-26 या कालावधीसाठी मंजूर झालेल्या प्रस्तावांनुसार एकूण 1,474 घरांच्या बांधकामाला हिरवा कंदील मिळाला आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 109, अल्प उत्पन्न गटासाठी 789 तर मध्यम गटासाठी 437 आणि उच्च गटासाठी 139 एवढी घरे बांधली जाणार आहेत. त्याचबरोबर 98 संक्रमण शिबिरे देखील बांधली जाणार आहे.
येथे वाचा – मुंबईकरांनो! तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..
कुठे आहे मुंबई मध्ये