Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून आता पात्र महिलांना तब्बल 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. हो, हे अगदी खरंय… नोंदणी, ई-केवायसी आणि इतर निकष पूर्ण केल्यानंतर पात्र बहिणींना थेट 1 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या मदतीमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येणार आहे. तुमच्या घरातील महिला सदस्य जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये मिळणार
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना राज्यातील महिलांसाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. DBT प्रणालीद्वारे मिळणारी ही रक्कम महिलांना आर्थिक आधार देणारी ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बहिणींना याचा मोठा फायदा होत असून त्यांच्या हातात दरमहा निश्चित रक्कम उपलब्ध होत आहे. मात्र, इतर काही शासकीय योजनांचा आधीच लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेत सामावून घेतले जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
येथे वाचा – तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांसाठी आता व्यवसाय कर्जाची (Business Loan) नवी सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनेत पात्र महिलांना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने दिले जाणार आहे. सुरुवातीला ही योजना मुंबई आणि उपनगरांमध्ये 3 सप्टेंबरपासून मुंबई बँकेमार्फत सुरू करण्यात आली असून, लवकरच ती संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाण्याची शक्यता आहे. या सुविधेमुळे महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यास किंवा एकत्र येऊन व्यवसाय उभारण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना यामुळे आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होईल.
येथे वाचा – पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत सध्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, हे अनुदान वाढवून 2100 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. अद्याप या वाढीव रकमेचा लाभ कोणत्या तारखेपासून लागू होईल याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मिळणाऱ्या अनुदानातूनच कर्जाच्या हप्त्यांची वसुली केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर नोंदणीचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत एकूण 1,12,70,261 अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 1,06,69,139 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.