मुख्यमंत्र्यांची घोषणा : आता या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना मदत; ‘ओला दुष्काळ’ सवलती मिळणार..!

Wet drought relief : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 2215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. ई-केवायसीच्या काही अटी शिथिल करून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात ही मदत पोहोचवली जात आहे. पुढील दोन-तीन दिवसांत उर्वरित आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर खरडून गेलेली जमीन, विहिरींचं नुकसान, घरं व इतर बाबींवरील मदतीसाठीही निर्णय घेण्यात येईल.

ओला दुष्काळाच्या सर्व सवलती मिळणार

बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सातत्याने “ओला दुष्काळ” (Wet drought) जाहीर करण्याची मागणी होत असली तरी अधिकृत मॅन्युअलमध्ये असा उल्लेख नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्यांनी स्पष्ट केले की, दुष्काळातील सर्व सवलती आणि उपाययोजना या वेळेस अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही लागू केल्या जाणार आहेत.

येथे वाचा – लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये मिळणार, पहा ही नवीन योजना..

या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना मदत

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारची मदत मिळेलच, पण त्याची वाट न पाहता राज्याने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे. पुढील काळात केंद्राकडून या मदतीचे रिइम्बर्समेंट मिळेल. त्याचबरोबर पाच लाख कुटुंबांना आरोग्य किट तसेच धान्य, डाळी यासह जीवनावश्यक वस्तूंचे किटही वितरित करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांची मदत थांबणार नाही, दिवाळीपूर्वी सर्व निर्णय जाहीर करून मदत खात्यात पोहोचवली जाईल.”

येथे वाचा – तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..

Leave a Comment