आता म्हाडाचा नियम बदलणार, घर खरेदीदारांसाठी गेमचेंजिंग अपडेट!

Mhada Scheme Rules : सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे मिळावीत यासाठी म्हाडा (Mhada) सातत्याने प्रयत्न करत असते. मात्र ही घरे खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचावीत, यासाठी सोडतीत काही कडक नियम ठेवलेले आहेत. त्यापैकीच एक नियम म्हणजे, सोडतीत मिळालेलं घर ताबा घेतल्यापासून किमान पाच वर्षांपर्यंत विकता येत नाही. पण आता परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. पुढे विजेत्यांना घर मिळाल्यानंतर इच्छेनुसार कधीही विक्री करण्याची परवानगी मिळू शकते. चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी.

म्हाडाच्या घरांवर लागू असलेली ‘पाच वर्षे विक्री न करण्याची अट’ लवकरच हटवली जाण्याची शक्यता आहे. या दिशेने म्हाडाने हालचाली सुरू केल्या असून यासंदर्भातला प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो लवकरच म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. मात्र हा प्रस्ताव मान्य झाल्यास म्हाडाची घरे (Mhada Flats) घेतल्याबरोबर लगेच विक्रीला निघण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे परवडणाऱ्या दरात घरं (affordable flats) खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे म्हाडाचे मूळ उद्दिष्ट धोक्यात येऊ शकते.

म्हाडाच्या सोडतीतून मिळालेली घरे खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचावीत, यासाठी घर विक्रीवर वेळेची मर्यादा ठेवण्यात आली होती. सुरुवातीला म्हाडाच्या घरावर १० वर्षे विक्री न करण्याची अट होती. मात्र, बेकायदेशीर व्यवहार वाढू लागल्याने ही अट रद्द करून नंतर पाच वर्षांची मर्यादा लागू करण्यात आली. सध्या, म्हाडाचे घर ताब्यात घेतल्यानंतर पाच वर्षांपर्यंत विक्री करता येत नाही. तरीदेखील मोठ्या प्रमाणावर घरे विकली जात असल्याचे समोर आले असून, त्यामुळे हे घर खरेदी करणाऱ्यांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर म्हाडाने आता पाच वर्षांची अट पूर्णपणे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

येथे वाचा – मुंबईकरांनो! तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..

अलीकडेच झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या 301 व्या बैठकीत एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला. पाच किंवा दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच घरे विकत घेणाऱ्यांच्या नावे हस्तांतर करण्यासंबंधीचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला होता. चर्चेदरम्यान अधोरेखित करण्यात आलं की आता संपूर्ण सोडत प्रक्रिया संगणकीकृत झाल्याने प्रत्येक अर्जदाराची माहिती म्हाडाकडे उपलब्ध आहे. शिवाय, एकदा अर्जदाराला घर मिळाल्यानंतर त्याला पुढे म्हाडाची सोडत किंवा कोणतीही सरकारी योजना मिळण्यास अपात्र ठरवले जाते. या पार्श्वभूमीवर, पाच वर्षे घर विक्रीवर असलेली अट रद्द करण्याची शक्यता तयार झाली आहे. गृहनिर्माण विभागाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश म्हाडाला दिले असून, तो प्रस्ताव तयार करताना म्हाडाच्या मूलभूत उद्दिष्टावर परिणाम होणार नाही, याची खात्री घेतली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

येथे वाचा – पुण्यात म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करताना किती खर्च येईल? ‘या‘ लोकेशनवर आहे सर्वात स्वस्त घर..!

प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू

गृहनिर्माण विभागाच्या निर्देशानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने ही अट हटवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच प्राधिकरणाच्या बैठकीसमोर ठेवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची पुष्टी केली. मात्र, त्यांनी अधिक माहिती देणे टाळले.

1 thought on “आता म्हाडाचा नियम बदलणार, घर खरेदीदारांसाठी गेमचेंजिंग अपडेट!”

  1. He karun kahi faida amhala 15 varsha zali mhadachi lottery laglich nahi amhi ajun rentvarch rahato pan jaynche 2 flat ahet tayna barobar lagte mhada chi lottery kahi nahi mhada che officer sarva settin kartat Ani taynch lokanchi lagte lottery

    Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group