Mhada 1BHK Flat Mumbai : मुंबईसारख्या शहरात घर घेणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. पण आता म्हाडा घेऊन आलंय अशी संधी जी प्रत्येकाला उत्साहित करेल. तुम्ही फक्त 15 लाखांपासून म्हाडाचा 1BHK आणि 2BHK फ्लॅट घेऊ शकता, सोबतचं जबरदस्त कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक सुविधा याठिकाणी मिळणार आहे… हे ऐकूनच आनंद दुप्पट होतोय ना.. या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर इथे 7 ते 15 मजली आकर्षक टॉवर्स उभारले गेले आहेत. प्रशस्त रस्ते, हिरवळीनं नटलेली बाग, शाळा, दुकाने, दवाखाने, सोयी-सुविधांनी भरलेला परिसर आणि जिम यामुळे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर होतं. डोंबिवली स्टेशनजवळील उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे प्रवासाचा त्रास कमी होतो.
भव्य संकुलात सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असून, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त तयार आणि रेडी पझेशन असलेली ही घरे खरेदीदारांना सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा आधार मिळतो. शिवाय, प्रस्तावित DMART शॉपिंग मॉल आणि गृहकर्जाची (Home Loan) सुविधा मिळाल्यामुळे ही संधी खरंच ‘ऑल-इन-वन पॅकेज’ ठरते. नेमकं कुठे मिळणार ही सुवर्णसंधी? चला, मुंबईत हे लोकेशन कुठे आहे हे जाणून घेऊया.
पहा घरांचे लोकेशन
हा भव्य म्हाडाचा प्रकल्प (Mhada Project) नेमका कुठे आहे याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना? म्हाडाचा हा ड्रीम प्रोजेक्ट उभारला गेलाय शिरढोण, कल्याण – डोंबिवली परिसरात. हे ठिकाण मुंबईच्या प्रगतीशील उपनगरांपैकी एक मानलं जातं, कारण इथली कनेक्टिव्हिटी आणि सुविधा दिवसेंदिवस वाढत आहेत.
येथे वाचा – आता म्हाडाचा नियम बदलणार, तुमचा फायदा होणार?
कल्याण-डोंबिवली परिसरात आधीच आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर, शाळा-कॉलेजेस, हेल्थकेअर सुविधा आणि शॉपिंग डेस्टिनेशन्स उपलब्ध आहेत. याशिवाय प्रस्तावित DMART मॉल आणि इतर प्रकल्पांमुळे या भागाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ राहणीमानासाठीच नाही, तर भविष्यातील गुंतवणुकीसाठीही हे लोकेशन सर्वोत्तम ठरतं.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
या प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घ्यायचंय असेल तर म्हाडाने त्यांच्या फेसबुक पेजवर काही नंबर दिले आहेत. तेच कॉन्टॅक्ट नंबर आम्ही सुद्धा खाली दिलेले आहेत. त्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. +91 80077 79174/7796698341/8669625060/92250 88411
येथे वाचा – मुंबईकरांनो! तयारीला लागा… दसरा दिवाळीत स्वस्त घरांची जम्बो लॉटरी, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..
2bhk