मुंबईकरांसाठी धमाल! म्हाडाची 1856 नवी घरं; लॉटरी लवकरच, सुविधा बघून हैराण व्हाल..!

MHADA Flats Mumbai : मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर आता टेन्शन घेऊ नका. कारण म्हाडा स्वस्तात घरं (Mhada Cheap Flats) उपलब्ध करून देण्याचं काम सातत्याने करत आहे. म्हाडा आता तुमच्यासाठी परत एकदा घेऊन येतंय तब्बल 1856 नव्या घरांची सुवर्णसंधी. या घरांमधल्या सुविधा आणि लोकेशन पाहिलं की तुम्ही नक्कीच थक्क व्हाल…

मुंबईच्या हृदयस्थानी असलेल्या नायगाव बीडीडी चाळींच्या ठिकाणी आता 243 मीटर एवढे उंच गगनचुंबी टॉवर बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेच्या हाय-राईज कमिटीकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या मंजुरीनंतर म्हाडाला 3 टॉवर 70 मजली आणि एक टॉवर 50 मजली अशा इमारती बांधण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.

लॉटरीतून मिळणार म्हाडाची 1856 घरे

चार नव्या इमारतींच्या बांधकामातून म्हाडाला एकूण 1856 विक्रीयोग्य घरे मिळणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प म्हाडाकडून लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. नायगाव बीडीडी चाळींच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या या चार टॉवरमधून म्हाडाला मिळणाऱ्या सदनिका लॉटरीच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी घर घेण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

येथे वाचा – म्हाडा लॉटरीची यादी जाहीर.. कोणाला लागणार घराची लॉटरी?

कोणकोणत्या सुविधा मिळणार?

हे टॉवर खरोखरच भव्य आणि आधुनिक असणार आहेत. त्यापैकी तीन टॉवर 70 मजल्यांचे असून त्यांची उंची तब्बल 243 मीटर असेल, तर एक टॉवर 50 मजल्यांचा असून त्याची उंची सुमारे 170 मीटर असेल. 70 मजल्यांच्या टॉवरमधील 61 मजल्यांवर निवासी सदनिका असतील, तर 50 मजल्यांच्या इमारतीतील सर्व मजले घरांसाठीच राखीव असतील. या प्रत्येक इमारतींमध्ये तीन बेसमेंट, एक ग्राऊंड फ्लोअर, सात पोडियम आणि एक अॅमेनिटीज फ्लोअर असणार आहे, ज्यामुळे रहिवाशांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.

त्यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये मिळणाऱ्या मुख्य सोयींसुविधा पुढील प्रमाणे असणार आहेत. (1) मल्टी लेव्हल पार्किंग, (2) अत्याधुनिक फायर सेफ्टी सिस्टिम, (3) हवा व प्रकाश यांसाठी ओपन स्पेस व गार्डन, (4) आधुनिक लिफ्ट व २४x७ जनरेटर बॅकअप, (5) सायकल/जॉगिंग ट्रॅक, (6) कम्युनिटी हॉल / स्वागत कक्ष, (7) सिक्युरिटी सिस्टीम (सीसीटीव्ही, इंटरकॉम), (8) चाइल्ड्रन प्ले एरिया, (9) व्यायामशाळा (जिम), (10) वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा तसेच (11)  क्लब हाउस इ. सुविधा असणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे.

येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त कनेक्टिव्हिटी व सुविधा..

पार्किंगमुळे प्रकल्प लांबणीवर जाणार का?

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पार्किंगच्या नियमावरून आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन योजनेत प्रत्येक फ्लॅटसाठी पार्किंगची सुविधा दिली जात असेल, तर तोच नियम नायगावच्या बीडीडी (BDD) प्रकल्पालाही लागू करावा, अशी मागणी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केली आहे. त्यांनी बीडीडीवासीयांना घरे रिकामी न करण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे या वादामुळे नायगाव बीडीडी पुनर्वसन प्रकल्प आणखी विलंबित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एवढ्या रहिवाशांचे होणार पुनर्वसन

नायगावमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाकडून राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजला जातो. मुंबईतील जुन्या बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट (BDD) चाळींचे पुनर्वसन करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, यात नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी या ठिकाणी असलेल्या चाळींचा समावेश आहे. शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या आणि जीर्ण झालेल्या या चाळींना आता आधुनिक, सुरक्षित आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवासस्थानांमध्ये रूपांतरित करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 15 हजारांहून जास्त रहिवाशांचे पुनर्वसन होणार असून, त्यामुळे हा प्रकल्प मुंबईतील सर्वात मोठ्या पुनर्विकास उपक्रमांपैकी एक ठरणार आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group