महिलांनो! आता ‘हे‘ काम करा, तरच मिळणार लाडक्या बहिणी योजनेचे पैसे..!

CM Ladki Bahin Yojna : “लाडकी बहीण योजना” ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूपच महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे गरीब कुटूंबातील महिलांना आर्थिक सुरक्षितता मिळाली असून योजनेमुळे त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होत आहे. यामुळे घरगुती खर्चात मदत होत असून महिला स्वावलंबी बनत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांना त्यांच्या आरोग्य, शिक्षण व पोषण याकडे लक्ष देण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आता महिला घरातील निर्णयप्रक्रियेत सहभाग घेऊ लागल्या असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच गरीब व पात्र महिलांना यातून मोठा दिलासा मिळत आहे. अलीकडेच आता या योजनेत मोठा बदल झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ई–केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिलांनी ही ई-केवायसी कुठे करावी? आणि याची शेवटची तारीख काय आहे? हे आपण जाणून घेऊया..

महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाचा नवीन नियम आणला आहे. योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आता सर्व पात्र महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेनुसार, लाभार्थी भगिनींना आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ई-केवायसी केल्याने योजनेचा लाभ फक्त खऱ्या आणि पात्र महिलांनाच मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ पुढेही मिळवण्यासाठी लाभार्थी महिलांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

लाडकी बहीण लाभार्थ्यांसाठी येथे ई-केवायसी सुविधा सुरू

राज्यातील “लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसीची सुविधा आता अधिकृत पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in वर उपलब्ध झाली आहे. महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, आधार कायद्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आता येथून पुढे सर्व लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण ई-केवायसीद्वारेच करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांचे आरोग्य व पोषण सुधारण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ थेट बँक खात्यात दिला जातो.

या तारखेपर्यंत करा ई-केवायसी

शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षात जारी परिपत्रकापासून 2 महिन्यांच्या आत लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. निर्धारित कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास त्या लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

यासोबतच, आता पुढील काळात दरवर्षी जून महिन्यात दोन महिन्यांच्या कालावधीत ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल. ही प्रक्रिया सोपी व सुलभ असून भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही ती उपयोगी ठरणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीटद्वारे सांगितले आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group