स्वस्तात वस्तू खरेदी करायची का? ताबडतोब जाणून घ्या या 2 ट्रिक्स..!

Best tricks for online shopping : सध्या ऑनलाइन शॉपिंगचं जोरदार वातावरण आहे. कारण काय तर ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज.. हे दोन्ही जबरदस्त सेल्स एकदम धडाक्यात सुरू होत आहेत. 23 सप्टेंबरपासून दोन्ही सेल्सची धमाल सुरू होणार आहे. आता या सेलमध्ये काय घडतंय माहितीये? लोक स्मार्टफोन, लॅपटॉप, हेडफोन्स आणि अजून कितीतरी गॅजेट्स व वस्तू खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. म्हणजे खरंच, घरबसल्या फेस्टिव्हलची शॉपिंग सुरू झाली आहे.

पण बघा ना, या सेलमध्ये कंपन्या “भारी डिस्काउंट” असल्याचं सांगून ग्राहकांना खूप आकर्षित करतात. पण खरी गोष्ट अशी आहे की, एखादी वस्तू खरंच स्वस्त मिळत आहे का, हे ओळखणं थोडंसं अवघड जातं. मग यावर उपाय काय? तर, दोन अगदी सोप्या आणि जबरदस्त ट्रिक्स आहेत. या वापरल्या, की तुम्ही खरेदी करण्याआधी त्या वस्तूची खरी किंमत तपासू शकता आणि फसगत होण्यापासून स्वतःला सहज वाचू शकता.

सर्वात पहिली ट्रिक म्हणजे – Buyhatke:AI ॲप..
हे ॲप वापरायला काही कठीण नाही. फक्त तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे ॲप डाउनलोड करा. या ॲपमुळे तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टची गेल्या काही महिन्यांची प्राइस हिस्ट्री दिसते. म्हणजेच, सध्याची किंमत खरंच खूप कमी आहे का, की आधी कधीतरी अजून स्वस्त मिळाली होती, हे तुम्ही एकदम स्पष्ट पाहू शकता.

या ॲपमध्ये तुम्हाला त्या प्रॉडक्टच्या किंमतीत झालेल्या वाढ-घटीचा एक ग्राफ दिसतो. त्यामुळे किंमत आत्ता खरंच फायदेशीर आहे का, हे ओळखणं खूप सोपं होतं. त्यातही एक खास फिचर म्हणजे ‘Compare’ टॅब, या टॅबमुळे तुम्ही तोच प्रॉडक्ट इतर वेबसाइट्सवर किती किमतीत मिळतोय, ते थेट पाहू शकता. म्हणजे, कुठे स्वस्तात आणि योग्य डील मिळणार आहे, याचा स्पष्ट अंदाज घेता येतो.

येथे वाचा – महिलांनो! आता ‘हे‘ काम करा, तरच मिळणार लाडक्या बहिणी योजनेचे पैसे..!

आता दुसरी ट्रिक अजून सोपी आहे – Pricehistoryapp.com ही वेबसाइट..
यासाठी कुठलं ॲप डाउनलोड करायची गरज नाही, फक्त ही वेबसाइट वापरली तरी काम होऊन जातं.

करायचं काय? तर, तुम्हाला आवडलेल्या प्रॉडक्टची ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरील लिंक कॉपी करा. मग तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये pricehistoryapp.com ही लिंक उघडा. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला एक सर्च बार दिसेल. त्या बारमध्ये ती लिंक पेस्ट करा आणि सर्चवर क्लिक करा. जसं तुम्ही लिंक टाकता तसं लगेच त्या प्रॉडक्टचा गेल्या वर्षभराचा किंमतीचा ग्राफ तुमच्या समोर येतो. आता या ग्राफकडे पाहून तुम्ही सहज समजू शकता की आत्ताची किंमत खरंच कमी आहे की अजून कधी स्वस्त मिळाली होती. आणि मजेची गोष्ट म्हणजे, ही वेबसाइट तुम्हाला ही वस्तू आता खरेदी करावी की नाही हे सुद्धा सांगते.

तर पाहिलंत ना, या दोन ट्रिक्स वापरल्या की ऑनलाइन शॉपिंगमध्ये चांगली बचत करता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे, “सेल”च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही सहज वाचू शकता. खरं सांगायचं तर, ऑनलाइन खरेदी करताना ही माहिती खूपच कामाला येते

Leave a Comment

Join WhatsApp Group