Mhada Lottery 2025 : मुंबई-पुण्यात स्वतःचं घर घेणं म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न. पण दिवसेंदिवस घरांच्या वाढणाऱ्या किमतीमुळे हे स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाही. मात्र, आता घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. आता फक्त 20 लाख रुपयांत मोक्याच्या ठिकाणी स्वतःचं घर मिळवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. एवढ्या कमी किमतीत तेही मोक्याच्या ठिकाणी घर घेण्याची ही संधी आहे. ही संधी म्हाडा तुमच्यासाठी घेऊन आली आहे. म्हाडाच्या योजनेतून कमी किमतीत चांगल्या सुविधांसह घर मिळते. चला जाणून घेऊया म्हाडाच्या या घराचे लोकेशन आणि बरीच माहिती…
MHADA पुणे बोर्ड दरवर्षी पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देते. यात पुण्यासोबतच पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या भागांचाही समावेश आहे. घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने केलं जातं. यंदा पुणे बोर्डाने एकूण 6,168 घरे जाहीर केली आहेत. यापैकी 4,186 घरे लॉटरीतून दिली जाणार असून उर्वरित घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. ही लॉटरी प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे.
म्हाडाच्या पुण्यातील 2025 च्या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक नागरिक थेट housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.
म्हाडाने पुणे विभागात तब्बल 4 हजार 186 घरांची सोडत जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर येथे घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड मध्ये मोक्याच्या ठिकाणी फक्त 20 लाखात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
म्हाडाच्या गृहनिर्माण सोडतीला सुरुवात झाली असून यंदा एकूण 6168 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात 1538 एवढी घरे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये 1534, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत 1114 एवढ्या घरांचा समावेश आहे. सर्व मिळून ही संख्या 4186 इतकी होते. याशिवाय, म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेत 1683 एवढे घरं तर PMAY योजनेत 299 एवढे घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षांच्या कालावधीत घरकुलांसाठी एकूण तीन सोडती घेण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास वेगाने होत असल्याने येथील विविध भागांमध्ये घरांच्या सोडती जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड लगतच्या चाकण आणि नेरे परिसरात म्हाडाचे नवीन प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
म्हाडाकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांना 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच या सोडतीसाठी अर्जांची प्रारूप यादी 11 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसरात पुणे म्हाडा मंडळाकडून सोडत जाहीर झाली असून, या घरांच्या किंमती 20 लाखांपासून 40 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत. तसेच हे घरे मोक्याच्या ठिकाणी असल्याची माहिती एका न्यूज माध्यमातून मिळाली आहे.
म्हाडा पुणे लॉटरी 2025 साठी लागणारी कागदपत्रे
(1) पॅन कार्ड, (2) आधार कार्ड, (3) रहिवासी (डोमिसाईल) प्रमाणपत्र, (4) उत्पन्नाचा दाखला, (5) शपथपत्र (Affidavit), (6) पासपोर्ट साईझ फोटो, (7) ई-स्वाक्षरी व स्वीकारपत्र, (8) रद्द केलेला चेक (Canceled cheque)
म्हाडा पुणे लॉटरी 2025 अर्ज फॉर्म फी किती आहे?
पुणे म्हाडा लॉटरी 2025 साठी अर्ज करायचा विचार करत आहात का? मग सगळ्यात आधी लक्षात ठेवा की अर्ज फॉर्मसाठी 500 रुपये फी आहे. यावर 18% जीएसटी मिळून एकूण रक्कम 590 रुपये होते.
ही फी तुम्हाला अर्ज करताना ऑनलाइन भरावी लागेल. आणि हो, ही फी एकदा भरली की परत मिळत नाही, म्हणजेच non-refundable आहे.
There you haven’t mentioned about Mumbai .
Location and
2bhk flat in costs
Documents (pdf)
Hi
Vasai Virar
Mahada ghar form
2BHK flate ka kha kemet hai
Mumbai or pune 2 bhk
Mahada. Ghar details pahije
She left a comment on my bolg appreciate the content
सर मला मुंबईला लालबाग, परेल इथं घर घेण्याची इच्छा आहे माझे शिवडी इथे घर आहे परंतु ती बिपीटीच्या अंतर्गत आहे. १०×१० एरीया आहे ती डेव्हलप होऊ शकते का? मला मार्गदर्शन करा कृपया.
धन्यवाद.
क्षेत्रफळ, किंमत व लोकेशन कळवळ्यास आमच्यासारख्या वरीष्ठ नागरीकांची धावपळ व प्रवासाचा ताण कमी होईल.