Mhada Flats : मुंबईकरांनो! आता तुमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आणखी जवळ येतय. कारण आता म्हाडाच्या घरांच्या किमतीत मोठी घट होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला स्वस्तात घर घेणं शक्य होईल. कमी किमतीत मुंबई पुण्यात उत्तम सोयी-सुविधा असलेलं घर मिळण्याची सुवर्णसंधी तुम्हाला भेटणार आहे. घर खरेदीचं प्लॅन करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा..
म्हाडा घरांच्या किंमतींमध्ये लवकरच कपात होण्याची शक्यता आहे. दरवेळी म्हाडाची सोडत जाहीर झाल्यानंतर घरांच्या जास्त किंमतीबाबत सर्वसामान्यांकडून तक्रारी केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर घरांच्या किंमतीत वाढ करणाऱ्या अनावश्यक घटकांवर कात्री लावण्यासाठी म्हाडाकडून विशेष समिती नेमण्यात आली होती. आता याच समितीचा अहवाल पुढील आठवड्यात म्हाडा प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे. या अहवालाच्या शिफारशींनुसार किंमती निश्चित केल्यास म्हाडाच्या घरांच्या किंमती तब्बल 8 ते 10 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येथे वाचा – मोक्याच्या ठिकाणी फक्त 20 लाखांत म्हाडाचे घर, पहा आवश्यक कागदपत्रे आणि फी..!
सामान्य माणसाला परवडेल अशा दरात घरे मिळावीत यासाठी म्हाडा सतत प्रयत्न करत आहे. मात्र घरांच्या किंमती ठरवताना फक्त रेडीरेकनरचा दर न बघता, त्यावर आणखी काही खर्चही धरले जातात. यामध्ये प्रशासकीय खर्चाचे पाच टक्के, बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीसाठी पाच टक्के, जमीन खरेदीसाठी घेतलेल्या रकमचे व्याज आणि बांधकाम शुल्क यांचा सरसकट विचार केला जातो.
याच कारणामुळे घरांच्या किंमतींमध्ये या सर्व खर्चांचा 10 ते 15 टक्क्यांहून अधिक वाटा बसतो आणि त्यामुळे एकूण किंमत वाढलेली दिसते. ही वाढ थांबवण्यासाठी आणि घरांच्या किंमती कशा कमी करता येतील याचा सखोल अभ्यास करण्यासाठी म्हाडाने तीन जणांची विशेष समिती नेमली होती. या समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर दोन अधिकारी यांचा समावेश होता.
येथे वाचा – स्वस्तात वस्तू खरेदी करायची का? ताबडतोब जाणून घ्या या 2 ट्रिक्स..!
समितीच्या निष्कर्षानुसार, रेडीरेकनरच्या दराशिवाय फक्त प्रत्यक्ष होणारा खर्चच धरला, तर म्हाडाच्या घरांच्या किंमतींमध्ये तब्बल 8 ते 10 टक्क्यांची कपात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आता याचा थेट फायदा घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना होणार असून या समितीचा सविस्तर अहवाल येत्या आठवड्यात सादर होणार आहे.
येथे वाचा – महिलांनो! आता ‘हे‘ काम करा, तरच मिळणार लाडक्या बहिणी योजनेचे पैसे..!