लाडक्या बहिणींनो! ई- केवायसी करताना ही चूक झाल्यास हप्ता बंद होणार, पहा महत्त्वाचे अपडेट..! 

Ladki bahin E-kyc : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता दरवर्षी केवायसी (Know Your Customer) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदा म्हणजेच 2025-26 या वर्षासाठी KYC प्रक्रिया 20 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. योजनेचा लाभ सतत सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांनी 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

KYC करताना काय काळजी घ्यावी?

सध्या संपूर्ण राज्यात केवायसी करण्यासाठी सुरुवात झाली आहे, त्यामुळे सुरुवातीला वेबसाईटवर खूप लोड असण्याची शक्यता आहे. वेबसाईटवर जर लोड असेल तर घाईघाईत KYC करू नये. घाईमुळे चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता असते. चुकीचा अर्ज भरल्यास हप्ता बंद देखील होऊ शकतो. त्यामुळे याची काळजी घ्या.

वेबसाईटवर लोड असताना वेबसाईट हळू चालणे, ओटीपी यायला उशीर होणे किंवा लिंक एक्सपायर होणे अशा प्रकारचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यात तुमचा वेळ देखील वाया जाऊ शकतो. त्यासाठी ज्यांच्याकडे चांगले इंटरनेट किंवा वाय-फाय आहे त्यांच्याकडून सुरुवातीला KYC पूर्ण करू शकता. किंवा थोडा वेळ थांबून, लोड कमी झाल्यावर KYC करणे योग्य ठरेल.

येथे वाचा – खुशखबर! आता म्हाडाचे घर स्वस्तं होणार, तब्बल एवढी किंमत होणार कमी..!

KYC केली नाही तर काय होईल?

जर तुम्ही ठरवलेल्या दोन महिन्यांच्या आत KYC पूर्ण केली नाही, तर शासनाकडून योजनेचे हप्ते थांबवले जातील. मात्र, लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी असल्याने KYC प्रक्रियेला वेळ लागू शकतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, कारण हप्ते सुरू ठेवले जाऊ शकतात. पण पुढील काळात लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला ठरलेल्या मुदतीत KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.

केवायसी कशी करावी? यासाठी खालील व्हिडिओ पहा

Leave a Comment

Join WhatsApp Group