Mumbai Mhada Lottery : मुंबईत फ्लॅट घेणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्नासारखं असतं, पण म्हाडा लॉटरी (Mhada Lottery) हे स्वप्न पूर्ण करण्याची खरी संधी देते. खासकरून मुंबई मंडळाची लॉटरी सामान्यांसाठी मोठा आधार असते. कारण खाजगी बिल्डर प्रोजेक्टच्या तुलनेत म्हाडाची 1 BHK घरे तब्बल 25-30% स्वस्तात मिळतात, त्यामुळे सामन्यांना मुंबईत घर खरेदी करणे परवडते. त्यातच पारदर्शक लॉटरी पद्धत, सरकारी विश्वासार्हता आणि कमी किंमत यामुळे म्हाडा लॉटरीचे अजूनच आकर्षण वाढते.
मुंबईत म्हाडाच्या घरांना नेहमीच प्रचंड मागणी असते आणि दरवर्षी हजारो लोक अर्ज करून नशिब आजमावतात. मुंबईतील म्हाडा लॉटरीवर अनेक लोक लक्ष ठेवून असतात. यंदाची 2025 मधील म्हाडा लॉटरी दिवाळीच्या सुमारास काढली जाणार असल्याचे म्हाडा कडून सांगण्यात आले होते. या लॉटरीत 5 हजार घरांचा समावेश असणार आहे. पण आता या लॉटरीच्या टाइमटेबलमध्ये बदल झाला आहे. ही लॉटरी नेमकी कोणत्या महिन्यात निघणार याची माहिती आपण जाणून घेऊया..
मुंबईत म्हाडाची लॉटरी कधी?
म्हाडाने केलेल्या घोषणेनुसार यंदाच्या सोडतीसाठी जाहिरात तयार करण्याचे काम याआधीच सुरू व्हायला हवे होते, मात्र अद्याप त्याची सुरुवातच झालेली नाही. दरम्यान महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होणार असल्याने आता ही सोडत मार्च–एप्रिल महिन्यात (2026) नंतरच काढली जाणार आहे. विशेष म्हणजे, मुंबई मंडळाकडून 2006 ते 2019 या कालावधीत एकदाही सोडत थांबली नव्हती. त्यानंतर 2020 ते 2022 या काळात सोडत झाली नाही, तर 2023 आणि 2024 म्हणजेच मागील वर्षी सोडत काढली होती. यंदा मात्र दिवाळीत सोडत होणार नसून ही सोडत येत्या मार्च–एप्रिल महिन्यात होण्याची शक्यतो आहे.
येथे वाचा – खुशखबर! आता म्हाडाचे घर स्वस्तं होणार, तब्बल एवढी किंमत होणार कमी..!