Bandhkam kamgar Bhandi Vatap Yojana : राज्य सरकारच्या भांडी वाटप योजनेअंतर्गत कोटा आता उपलब्ध झाला असून, बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्जदारांना या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अपॉईंटमेंट घेता येणार आहे. ही अपॉइंटमेंट आणि अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे याची माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत..
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे (BOCW) असणं आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर मिळणारा नोंदणी क्रमांक (Registration Number) हा अर्जासाठी अनिवार्य आहे. नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी Google वर ‘Maha BOCW Profile’ अशी सर्च करून पहिल्या वेबसाईटवरील “Proceed to Form” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून OTP व्हॅलिडेट केल्यानंतर अर्जदाराची माहिती व नोंदणी क्रमांक दिसतो. हा क्रमांक अर्जासाठी जतन करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांनो खुशखबर! अतिवृष्टीग्रस्तांना 17 हजारांपर्यंत पीकविमा, तीन हेक्टरपर्यंत मदत..!
यानंतर अर्जदारांनी hikit.mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन “नवीन अपॉईंटमेंट” या पर्यायावर क्लिक करून आपला BOCW नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर OTP सत्यापित करून संबंधित जिल्ह्यातील कॅम्प किंवा शिबिर निवडून अपॉईंटमेंटची तारीख निश्चित करता येते. लाल रंगातील तारखा पूर्ण भरलेल्या असतात, तर पांढऱ्या तारखा उपलब्ध असतात.
अपॉईंटमेंट निश्चित केल्यानंतर पावतीची प्रिंट काढून घ्यावी, आणि त्या पावतीसोबत आधार कार्ड घेऊन निवडलेल्या कॅम्पच्या पत्त्यावर उपस्थित राहावे. ठिकाणी अर्जदाराचा बायोमेट्रिक (अंगठा) स्कॅन घेतल्यानंतर त्यांना भांड्यांचा संच दिला जातो.
येथे वाचा – खुशखबर! दिवाळीपूर्वी घरांची लॉटरी; प्राईम लोकेशनवर घरे, पहा घरांच्या किमती..!
भांडी वाटप योजनेबाबत ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली असून, पात्र कामगारांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा..