आज या 5 जिल्ह्यांना थेट अलर्ट, पुढील 24 तास घराबाहेर जाणे टाळा..

राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पावसाचा जोर कमी होण्याचे चिन्ह अद्याप दिसत नाही. भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा एकदा अलर्ट जारी करत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून आकाश ढगाळल्याने दिवसाढवळ्या काळोखाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याशिवाय पुणे, जालना आणि इतर काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain)

आज पुण्याच्या घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांत आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही पावसाची जोरदार सुरुवात झाली असून हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुणे, जालना, ठाणे, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भूम-परंडा परिसरातील नळी, दुधना आणि बानगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून या सततच्या पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक शेतीमाल पाण्याखाली गेला आहे. ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी लहान पूल आणि बंधारे तुटल्याच्या घटना समोर येत आहेत.

येथे वाचा – शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? सरकारकडून हालचाली सुरू.. पहा फायद्याची बातमी..!

जालना जिल्ह्यात आज येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जालन्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यातच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

येथे वाचा – शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? येथे पहा खरी आकडेवारी..!

Leave a Comment