Mumbai Housing Lottery : मुंबईकरांसाठी दिवाळीपूर्वीच एक जबरदस्त बातमी आली आहे. या सणासुदीच्या काळात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. शहरातील प्राईम लोकेशनवर नव्या घरांची लॉटरी (Housing Lottery) जाहीर होणार असून, पुढील आठवड्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अनेक जण या संधीची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर स्वतःच्या घराची चावी हातात येणे यापेक्षा आनंददायी क्षण दुसरा काहीच नाही. जर तुम्हीही मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी पूर्ण नक्की वाचा. कारण या ठिकाणी आपण या घरांच्या किमती आणि लोकेशनची संपूर्ण माहिती घेतली आहे.
मुंबईमध्ये दिवाळीत घरे घेण्याची सुवर्णसंधी
मुंबईकरांसाठी या दिवाळीत घर घेण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेने आता प्रथमच म्हाडाच्या धर्तीवर घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. 20 टक्के प्रीमियमच्या बदल्यात विकासकांकडून मिळालेली 426 एवढी घरे यासाठी निवडली गेली असून, ही सर्व घरे दिवाळीनंतर लॉटरी प्रणालीद्वारे विक्रीसाठी खुली होणार आहेत. पुढील आठवड्यापासून नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. या घरांचा आकार 270 ते 528 चौरस फूट इतका असून, मुंबईकरांना महापालिकेच्या माध्यमातून घर खरेदीची नवी संधी मिळणार आहे. या प्रक्रियेतून महापालिकेला तब्बल 300 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
येथे वाचा – म्हाडाची नवीन योजना; कोणीही घ्या घर, पहा कशी आहे नवी योजना?
हे आहे घरांचे लोकेशन
मुंबईतील विविध भागांमध्ये महापालिकेची घरे उपलब्ध होणार आहेत. भायखळा पश्चिम, कांदिवली (पूर्व आणि पश्चिम), अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पश्चिम, दहिसर पश्चिम, कांजुरमार्ग आणि भांडुप पश्चिम या ठिकाणी ही घरे देण्यात येणार आहेत. भायखळ्यातील घरे आकाराने लहान असली तरी त्यांची किंमत तुलनेने जास्त आहे, तर उपनगरांतील घरे अधिक प्रशस्त म्हणजेच आकाराने मोठी असून त्यांचे दर तुलनेने कमी असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भांडुप पश्चिममध्ये सर्वाधिक 270 घरे असून, उर्वरित 186 घरे इतर ठिकाणी असणार आहेत.
येथे वाचा – म्हाडाचं 90 लाखाचं घर 28 लाखात कसं मिळेल? असा करा अर्ज..!
अशा आहेत घरांच्या किमती
मुंबईत उपलब्ध होणाऱ्या या घरांच्या किमतीही नागरिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या घरांचा आकार 270 ते 528 चौरस फूटांदरम्यान असून, त्यांची किंमत सुमारे 60 लाखांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत असेल. लोकेशननुसार दरात थोडा फरक पडणार आहे. शहरातील मर्यादित जागा आणि वाढती मागणी लक्षात घेता, ही किंमत अनेकांसाठी आकर्षक ठरू शकते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी विशेष ठरू शकते.