Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता अखेर त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर आजपासून हप्त्याचे वितरण सुरू झाले असून, पुढील काही दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ₹1500 इतकी रक्कम जमा होणार आहे.
आज दिनांक 10 ऑक्टोबरपासून ते 13 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हा हप्ता पाठवला जाणार आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अनेक जणांचा प्रश्न होता की “ई-केवायसी पूर्ण नसल्यास हप्ता मिळेल का?” — तर याबाबत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्यांना मागील वेळी हप्ता मिळाला होता, त्यांनाही या वेळेस पैसे जमा होणार आहेत, ई-केवायसी झाली असो वा नसो. मात्र पुढील हप्त्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
येथे वाचा – खुशखबर! भांडी वाटप योजना सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज..!
ग्रामविकास मंत्री अदिताई तटकरे यांनी काल रात्री ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळेल.” तसेच, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करावी.