MHADA Flats : मुंबई किंवा पुण्यात स्वतःचं घर असावं हा विचार मनात आला की सगळ्यात आधी आठवतं ती म्हणजे ‘महागाई’.. पण यावेळी म्हाडा तुमचं स्वप्न खरं करायला सज्ज आहे. कल्पना करा, जिथं घराची किंमत 90 लाख असते, तिथं तुम्हाला ते फक्त 28 लाखांत मिळू शकतं. हे स्वप्न नाही, तर म्हाडा लॉटरीची (Mhada Lottery) खरी ताकद आहे. ही योजना म्हणजे सामान्य माणसासाठी घर मिळवण्याची एक लाइफ-चेंजिंग चान्स आहे. सुरक्षित, परवडणाऱ्या आणि प्राईम लोकेशनवरच्या घरासाठी याहून चांगली संधी मिळणं कठीणच आहे असंच म्हणावं लागेल. पण लक्षात ठेवा, ही संधी फक्त 31 ऑक्टोबरपर्यंतच आहे. चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊया म्हाडाच्या या घराबद्दल संपूर्ण माहिती..
एका युट्युबरने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाकड भागात तब्बल 90 लाखांचा फ्लॅट फक्त 28 लाखांत मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही घरे म्हाडाच्या पुणे विभागातील लॉटरीअंतर्गत देण्यात येणार असून, या प्रकल्पाचे नाव ‘यश्विन अर्बो सेंट्रो’ असे आहे.
हा प्रीमियम प्रोजेक्ट वाकड मधील भूमकर चौकाजवळ, इंदिरा गांधी कॉलेजच्या परिसरात हायवे टच लोकेशनवर उभारला जात आहे. विलास जावळकर ग्रुपकडून विकसित होत असलेल्या या योजनेत 2 BHK आणि 3 BHK अशा प्रकारचे फ्लॅट्स उपलब्ध असून, 28 सदनिका खास म्हाडासाठी राखीव आहेत. (MHADA 2BHK Flats)..
90 लाखाचा फ्लॅट 28 लाखात कसा मिळणार?
सध्या हा प्रकल्प अंडर कन्स्ट्रक्शन अवस्थेत आहे. म्हाडाकडून देण्यात येणाऱ्या या घरांचा कार्पेट एरिया 500 ते 600 स्क्वेअर फूट असून, किंमत 28.42 लाख रुपये ते 28.74 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या परिसरातील साधारण बाजारभावानुसार, अशा लोकेशनवरील फ्लॅट्सची किंमत 80 ते 90 लाखांपर्यंत जाते. त्यामुळे केवळ 28 लाखांत प्रीमियम लोकेशनवर घर (Mhada Flats) मिळण्याची ही म्हाडाकडून मिळालेली अभूतपूर्व संधी मानली जात आहे.
येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त कनेक्टिव्हिटी व सुविधा, पहा घरांचे लोकेशन व संपर्क..!
असा करा अर्ज
या घरासाठी म्हणजेच ‘यश्विन अर्बो सेंट्रो’ (Yashwin Urbo Centro) वाकड, पुणे’ या म्हाडा प्रकल्पासाठी अर्ज करायचा असल्यास, सर्वात आधी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) ची लॉटरी साठी नोंदणी, अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि पेमेंट हे सर्व कामे https://lottery.mhada.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन होतात. या वेबसाइटवर लॉगिन केल्यानंतर “Pune Board Lottery 2025” विभाग निवडावा, त्यात ‘Yashwin Urbo Centro, Wakad’ प्रकल्पाचा पर्याय सहज सापडेल. अर्ज भरण्याची आणि फी भरण्याची प्रक्रियाही दिलेल्या टप्प्यांनुसार सुलभ आहे. हे संपूर्ण प्रोसेस डेस्कटॉप किंवा मोबाइलवरून अत्यंत सोपी आणि यूजर-फ्रेंडली आहे.
येथे वाचा – मुंबईत म्हाडाची 1856 नवी घरं; लॉटरी लवकरच, सुविधा बघून हैराण व्हाल..!