काय सांगता! मुंबईत BMC काढणार म्हाडासारखी लॉटरी.. या प्राईम लोकेशनवर घरे..!

मुंबईकरांनो, आता BMC सुद्धा म्हाडाच्या धर्तीवर स्वस्त घरांची लॉटरी काढणार आहे. शहरातील प्राईम लोकेशनवर ही घरे उपलब्ध होणार आहेत. घरांच्या प्रचंड महागाईत सर्वसामान्यांसाठी ही योजना म्हणजे सोन्याची संधीच असणार आहे. अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेची माहिती लवकरच जाहीर होणार आहे. (Cheap Flats Mumbai)..

BMC लवकरच 184 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घरांच्या विक्रीतून सुमारे 150 कोटी रुपयांचे उत्पन्न बीएमसीच्या तिजोरीत जमा होणार आहे. विशेष म्हणजे, ही घरे रेडी रेकनर दरांपेक्षा किंचित जास्त किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. योजनेचा सविस्तर तपशील लवकरच उघड केला जाणार आहे.

110 घरांचं लोकेशन ठरलं

सध्या बीएमसीकडून सुमारे 110 घरांचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे, तर उर्वरित घरांसाठी जागा ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या विकास आराखड्यानुसार, 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांवर होणाऱ्या बांधकामामध्ये बीएमसीला एकूण घरांपैकी 20 टक्के घरे कमी आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राखून ठेवणे अनिवार्य ठरणार आहे.

येथे वाचा – मुंबईकरांसाठी धमाल! म्हाडाची 1856 नवी घरं; लॉटरी लवकरच, सुविधा बघून हैराण व्हाल..!

बीएमसीला (BMC) कांजुरमार्ग, भायखळा, बोरीवली आणि अंधेरी या भागांतील प्रकल्पांमधून बिल्डर्सकडून घरे मिळणार आहेत. 2018 मध्ये नव्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर या प्लॉट्सवरील बांधकाम पूर्ण झाले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, मुंबईतील सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत या हेतूने बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. पुढील काही महिन्यांत आणखी 300 ते 400 एवढी घरे मिळण्याची अपेक्षा असून, ती लॉटरीच्या माध्यमातून नागरिकांना दिली जाणार आहेत.

येथे वाचा – म्हाडा लॉटरीची यादी जाहीर.. कोणाला लागणार घराची लॉटरी?

अशा पद्धतीने काढली जाणार घरांची लॉटरी

बीएमसीने घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या धर्तीवर लॉटरी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, म्हाडासारखीच नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यानंतरच लॉटरी काढली जाणार आहे. यासाठी बीएमसी म्हाडाशी समन्वय साधण्याचाही विचार करत आहे. तसेच, म्हाडाच्या पद्धतीप्रमाणेच लॉटरीसाठी नवी प्रणाली विकसित करण्याची तयारी सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

येथे वाचा – मुंबईत फक्त 15 लाखात म्हाडाचा 1BHK फ्लॅट; जबरदस्त कनेक्टिव्हिटी व सुविधा..

मोठ्या निधीची गरज

मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या काही वर्षांत अनेक नव्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांची आखणी केली आहे. सध्या पालिकेकडे सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असला, तरी या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 2 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे बीएमसीसमोर निधी उभारणीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळाली आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group