Mumbai MHADA Homes : मुंबईत स्वतःचं घर मिळणं म्हणजे एक मोठं यश मानलं जातं. पण त्यामागचा प्रवास सोपा नसतो. पैशांची जुळवाजुळव, बँकांचे फेरफटके, कर्जासाठीची कागदपत्रं आणि मंजुरीसाठीची दीर्घ प्रतीक्षा… या सगळ्यामुळे अनेकजण थकून जातात. अशा वेळी म्हाडा (MHADA) आणि सिडको (CIDCO) सारख्या संस्थांच्या घर सोडती लोकांसाठी मोठा आधार ठरतो. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना स्वतःचं घर मिळालं आहे. मात्र काहीवेळा या योजना देखील अपवाद ठरतात.
मुंबईत म्हाडाची काही आलिशान घरं अजूनही खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. दोन वेळा सोडत काढूनही ही घरं विकली न गेल्याने, म्हाडाने आता दक्षिण मुंबईतील ही अपवादात्मक घरे ‘ओपन टू ऑल’ या नवीन योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. म्हणजेच, आता इच्छुक खरेदीदार आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ही घरे थेट खरेदी करू शकतात.
ही घरं नेमकी कुठे आहेत?
दक्षिण मुंबईच्या ताडदेव परिसरात म्हाडाची ही आलिशान घरं आहेत. प्रत्येक घराची किंमत अंदाजे 6 ते 7 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं समजतं. इतक्या जास्त किंमतीमुळे, सोडतीत समाविष्ट करूनही या घरांना खरेदीदार मिळाले नाहीत. त्यामुळे म्हाडाने आता ही घरं ‘ओपन टू ऑल’ तत्त्वावर विक्रीसाठी खुली केली असून, जर विक्री झाली नाही तर ती भाड्याने देण्याचाही पर्याय ठेवला आहे.
येथे वाचा – म्हाडाचं 90 लाखाचं घर 28 लाखात कसं मिळेल? असा करा अर्ज..!
नेमकी कशी आहे ‘Open to All’ योजना?
म्हाडाशी संबंधित विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ही घरं केवळ ठराविक आर्थिक श्रेणीतील खरेदीदारांसाठीच उपलब्ध होती. पण आता म्हाडाने मोठा निर्णय घेत, कोणत्याही आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार ही घरं खरेदी करण्याची संधी दिली आहे. ही घरं पूर्वनिर्धारित किमतीतच विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. मात्र, या टप्प्यानंतरही जर खरेदीदार मिळाले नाहीत, तर म्हाडा ती घरे भाड्याने देण्याचा पर्याय वापरणार आहे.
येथे वाचा – म्हाडाचं 90 लाखाचं घर 28 लाखात कसं मिळेल? असा करा अर्ज..!
म्हाडाची घरं कोट्यवधींची? खरंच इतकी महाग? अनेकांच्या मनात हाच प्रश्न फिरतोय. पण यामागचं कारण थोडं वेगळं आहे. जेव्हा खाजगी विकासक गृहनिर्माण प्रकल्प उभारतात, तेव्हा नियमानुसार त्यांना काही घरे हाऊसिंग स्टॉक प्रीमियमच्या रूपात म्हाडाकडे द्यावी लागतात. त्याच प्रक्रियेअंतर्गत ताडदेवमधील आलिशान क्रिसेंट टॉवर मधील ही घरं म्हाडाला मिळाली आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत दोन वेळा सोडत काढूनही या घरांना अजूनही खरेदीदार मिळालेला नाही. हीच सध्याची खरी परिस्थिती आहे.
या घरांबद्दल प्रश्न आणि उत्तरे
1. ताडदेवमधील म्हाडाची घरं नेमकी कुठे आहेत?
दक्षिण मुंबईच्या ताडदेव परिसरातील क्रिसेंट टॉवर या आलिशान इमारतीत म्हाडाची ही घरे आहेत. गृहनिर्माण प्रकल्प उभारणाऱ्या विकासकाने हाऊसिंग स्टॉक प्रीमियमच्या स्वरूपात ही घरे म्हाडाकडे हस्तांतरित केली होती.
2. दोन सोडती झाल्यानंतरही ही घरं विकली का जात नाहीत?
गेल्या दोन वर्षांत म्हाडाने या घरांसाठी दोनदा सोडत काढली, तरीही खरेदीदार मिळाले नाहीत. कारण सोपे आहे—ही घरे उच्च उत्पन्न गटासाठी राखीव असून, त्यांची किंमत तब्बल ६ ते ७ कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी ती परवडणारी नाहीत.
3. ‘ओपन टू ऑल’ योजना नक्की काय आहे?
म्हाडाने आणलेली ही नवी योजना म्हणजेच ‘ओपन टू ऑल’. याअंतर्गत, पूर्वी केवळ उच्च उत्पन्न गटासाठी राखीव असलेली ही घरे आता कोणत्याही आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीला खरेदी करता येतील. म्हणजेच, आर्थिक क्षमतेनुसार इच्छुक खरेदीदारांना ही घरे खुलेपणाने उपलब्ध होतील.
Mala pn mahde madhe flat pahijel
I want to fill form for Pune mahada lottery