MHADA Lottery : मागील काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाने तब्बल 5,354 घरं आणि 77 भूखंडांसाठी मोठी लॉटरी जाहीर केली होती, ज्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता लॉटरी साठी अर्ज केलेल्या अर्जदारांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण उद्या, 11 ऑक्टोबर रोजी, ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या लॉटरी काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही थेट घरी बसल्या पाहू शकता. ते कसं आणि कोणत्या लोकांना घर मिळणार? याची माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत.
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे आणि वसई परिसरातील वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनांतर्गत एकूण 5354 घरे तसेच कुळगाव-बदलापूरमधील 77 भूखंड विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल 1,84,994 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अनामत रकमेसह 1,58,424 एवढे अर्ज पात्र ठरले आहेत. आता या लॉटरीच्या प्रतीक्षेचा शेवट उद्या, 11 ऑक्टोबर रोजी, लॉटरी सोडतीद्वारे होणार आहे.
कोकण मंडळाचा लॉटरी सोहळा ठाण्यात पार पडणार असून, विजेत्या अर्जदारांची यादी सायंकाळी 6 नंतर म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. याशिवाय, विजेत्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारेही माहिती पाठवली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण सोहळा म्हाडाच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजवर थेट पाहण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
येथे वाचा – मुंबईकरांनो! दिवाळीत घ्या म्हाडाचे घर; दोनशे घरांची संधी, म्हाडाचा दिवाळी स्पेशल सेल..
मोबाईलवर लॉटरीचे लाईव्ह प्रक्षेपण असे पहा
हा लॉटरी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून https://youtube.com/live/K9bX1SXAESQ0feature=share या लिंकवर पाहता येईल. सोबतच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial आणि https://www.youtube.com/@MHADAOFFICIAL या यूट्यूब पेजवर पाहता येईल. त्यामुळे उद्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर अल्पावधीतच सोडतीचा निकाल पाहू शकता.
येथे वाचा – मुंबईकरांनो! दिवाळीत घ्या म्हाडाचे घर; दोनशे घरांची संधी, म्हाडाचा दिवाळी स्पेशल सेल..
म्हाडाच्या लॉटरीतील विजेत्यांची प्रतीक्षा आता अखेर उद्या संपणार आहे. सायंकाळी 6 वाजल्यानंतर https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विजेत्या अर्जदारांची यादी पाहता येईल. यासोबतच, ज्यांचे नाव लॉटरीत आले आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तत्काळ एसएमएसद्वारेही माहिती मिळणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.